आझादी का अमृत महोत्सवानिमित्त रायसोनी महाविद्यालयात भरगच्च उपक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी, या उद्देशाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये आज ता. १० बुधवार रोजी सकाळच्या सत्रात ७५ विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून हर घर तिरंगा उपक्रमाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले होते.  त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढले. तर दुपारच्या सत्रात महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य स्पर्धेत आपली कला सादर करत विविध पारितोषिके पटकावली.

तसेच तिसऱ्या सत्रात म्हणजेच सायंकाळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काव्यरत्नावली चौकात हर घर तिरंगा मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ‘एक शाम देश के नाम’ या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांसमोर पथनाट्यासहित समूहनृत्य व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करून सामान्य जनतेत देशप्रेमाची भावना निर्माण केली. त्यात ‘ घरोघरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, हर घर तिरंगा लढा महान-माझा तिरंगा माझी शान, तिरंगे को सलामी हमारी शान है, हर घर तिरंगा हमारी पहचान है’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा ध्वज फडकवण्या संदर्भातील नियमांविषयीची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी, यासाठी पथनाट्यातून मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी आपले जूने कपडे गरिबांना दान करून आदर्श निर्माण केला. तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, भारताचा आर्थिक व सामाजिक विकास मोठ्याप्रमाणात झाला असल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाप्रमाणे आपल्या देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु झाली असून, या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या इतर देशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या देशातच राहून प्रगती करावी.  कारण उच्चशिक्षणासाठी आज भारतातील अनेक शेक्षणिक संस्था मोठ्या ताकदीने विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण देत आहे. त्यामुळे आज भारतातील प्रत्येक युवकाने आपल्या भारताचा आर्थिक स्तर कसा उंचावेल तसेच आपल्या देशातील उद्योगक्षेत्र अधिक प्रगती कशी करेल याचा हट्टहास धरायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला प्रा. श्रिया कोगटा, प्रा. वसीम पटेल, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, रजिस्टार अरुण पाटील, प्रकाश पाटील, प्रा. सोनल तिवारी, प्रा. डॉली मंधान यासह रॉटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट विद्यार्थी सदस्यांचे व रेडक्रॉस रक्तपेढीचे सहकार्य लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.