जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज दहीहंडी (Dahi Handi) असून कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास (Govindas) दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये (Government Hospital) त्यांना मोफत उपचार  (Free Treatment) देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल विधानसभेत (Assembly) केली होती.

त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने (Government Hospital), वैद्यकीय महाविद्यालये (Medical Colleges),  महानगरपालिका (Municipalities), नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने (Zilla Parishad Clinics) यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.