केळी व्यापाऱ्याची साडेचार लाखात फसवणूक

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल शहरातील एका केळीच्या लहान व्यापाऱ्यास मोठ्या व्यापाऱ्याने केळीचे 4 लाख 19 हजार 786 रुपये उधारीचे दिले नाही म्हणून चार व्यापाऱ्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील सईद पुरा भागातील लूकमान खान सुलतान खान या लहान केळीच्या व्यापाऱ्याने त्याने अनेक शेतकऱ्यांकडून केळी एकत्रित करीत 28 फेब्रुवारी 21 ते 23 मार्च 2021 या दरम्यान वेळोवेळी 4 लाख 19 हजार 786 रुपयांची केळी यावल शहरातील बाबा नगर भागातील रहिवासी व केळीचे मोठे व्यापारी शेख लतीफ शेख नसीर शेख वसीम शेख लतीफ शेख रईस शेख लतीफ आणि शेख जान शेख रईस यांना उधार दिली होती.

मात्र या चौघा व्यापाऱ्यांनी अद्यापही त्यांना केळीचे पैसे दिले नाही. वर्षभरापासून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे दिले नाही, उलट फिर्यादी यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.  उधारीवर दिलेल्या केळीचा व शब्दाचा विश्वासघात करीत फसवणूक केली म्हणून चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.