८४ लाखांची फसवणूक करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा ; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा

0

चाळीसगाव ;- येथील १५ हजार चौरस फूट जागा आणि त्या परिसरात असलेला बंगला परस्पर इतरांच्या नावावर करून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल खान्देश एक्स्ट्रेशन लिमिटेड कंपनीच्या लक्ष्मीपुरी खामरि गोंदिया या कंपनीच्या सहा संचालक ,सदस्यांविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खान्देश एक्स्ट्रेशन लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर बालमुकुंद द्वारकादास फाफट (माहेश्वरी ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, ऑगष्ट २०१७ मध्ये कंपनीची गट क्रमांक ३२०/१ ब,३२०/१ अ , व ३२० / २ अ मधील १५ हजार चौरस फूट जागा व त्या परिसरात बनलेल्या बंगला हा कुंजीलाल माहेश्वरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर विक्री करून त्याचे पैसे कंपनीस ट्रान्स्फर करण्याच्या बोर्ड मीटिंगमध्ये ठरलेले असताना १७ नोव्हेंबर २०१७ ला कंपनी चे चारही संचालकांनी त्यामध्ये फिर्यादी व आरोपी संचालक कुंजीलाल भुतडा वय ८१, रा. देवनागरी खामला नागपूर, राजकुमार अमृतलाल भुतडा (माहेश्वरी ) वय ६७ रा. आमगाव ता. आमगाव जिल्हा गोंदिया ,अरुणकुमार गोविंदलाल भैय्या वय ६४ पूर्व डायरेक्टर यांनी श्रीमती फुलकुंवर देवी कुंजीलाल भुतडा ( माहेश्वरी ) वय ७७ रा. हिरापूर रोड ,साने गुरुजी नगर चाळीसगाव यांना वरील गट क्रमांकची जमीन व बंगला चे चाळीस गाव उपनिबंधक कार्यालयात रजिस्टर्ड क्रमांक २७२९/२०१७ अन्वये ८४ लाख मध्ये विक्री केलेले असताना कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये त्यावेळेस संचालकांनी घेतलेल्या निर्णयानुसार वरील सहा आरोपींनी कंपनीला न देता फसवणूक केल्याची फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.