Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»अरे वाह.. मोबाइल कंपनी १ लाख नोकऱ्या देणार
    नोकरी संदर्भ

    अरे वाह.. मोबाइल कंपनी १ लाख नोकऱ्या देणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एक मोबाईल कंपनी तब्बल १ लाख नोकऱ्या देणार आहे. तैवान येथील कंपनी फॉक्सकॉन भारतातील आपली गुंतवणूक दुप्पट करण्याच्या विचारात आहे. यामुळे भारतातील एक लाखहून अधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळू शकणार आहेत. कंपनीचे भारतातील प्रतिनिधी वी ली यांनी रविवारी लिंक्डइनवर पोस्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना याबाबत माहिती दिली आहे.

    एक लाखाहून अधिक जणांना नोकऱ्या

    या पोस्टनुसार,  कंपनी दक्षिण आशियात गुंतवणूक दुप्पट करण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे म्हटले आहे. ली यांनी म्हटले की, भारतातील रोजगार, व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. पुढच्या वर्षी वाढदिवसानिमित्त आणखी मोठी भेट देण्यासाठी आणि आणखी मेहनत करणार आहोत. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये विमानतळानजीक ३०० एकरावर प्रकल्प विकसित करणार आहे. यात आयफोन असेम्बल केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातून एक लाखाहून अधिक जणांना नोकऱ्या मिळू शकतात.

     

    ९ निर्मिती केंद्रे

    तज्ज्ञांच्या मतानुसार, फॉक्सकॉनची मूळ कंपनी होन हाई प्रिसिजन इंडस्ट्रीजचे चेअरमन यंग लियू यांना मागच्या महिन्यात भारतात गुंतवणूक वाढण्याचे संकेत दिले होते. भारतात कंपनीची ९ निर्मिती केंद्रे आहेत. भारतातील या निर्मिती केंद्रांशी जोडलेल्या ३०हून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. चीन आणि अमेरिकेसोबत वाढलेल्या वादांमुळे कंपनीने अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा.

     

     

    Foxconn Foxconn Investment Foxconn Investment In India iPhone
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif