गणपती बाप्पा विशेष रेसिपी – तांदळाची खीर/ मुगोरी

0

साहित्य :

१½ कप गूळ, १ कप तांदळाचे पीठ, १½ तांदळाचे पीठ घोळ बनवण्यासाठी, ४ चमचे ओल्या नारळाचा खीस, १ चमचा वेलदोड्याची पूड, ½ चमचा जायफळाची पूड, उकड तयार करण्यासाठी २/३ कप पाणी आणि खीर बनवण्यासाठी २½ ग्लास पाणी, १ चमचा चारोळी, ३ चमचे साजूक तूप आणि एक कप गरम दूध, किसमिस, काजू, केसर 

कृती:

• प्रथम एका छोट्या पातेल्यात तांदळाची उकड काढण्यासाठी २/३ कप पाणी उकळून घ्यावे.

• पाणी उकळल्यावर त्यात पीठ घालून भाकरीसारखी उकड काढावी.

• त्यानंतर साध्या पाण्याचा वापर करून उकड गरम असतानाच मळून घ्यावी आणि त्याचे अगदी छोटे मण्यासाखे गोळे तयार करावेत.

• आता पातेल्यात खिरीसाठी पाणी उकळून घ्यावे आणि त्यात गुळ वितळून घ्यावा.

• गुळ वितळल्यानंतर यात तांदळाच्या पिठाचा घोळ घालून एकजीव करा आणि नंतर यात ओल्या नारळाचा खीस, चारोळी, वेलदोडे आणि जायफळ पावडर इत्यादी घालून एकजीव करावे.

• आता यात मुगोरी म्हणजेच तांदळाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे घालावे आणि ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी.

• आता हि खीर मध्यम थंड करून यात गरम दूध घालावे आणि एकजीव करून गरमागरम मुगोरीचा आस्वाद घ्यावा.

• सजावटीसाठी वरतून तळलेले काजू, किसमिस आणि केसर घालावे.

• (मुगोरी गरम असताना यात गरम दूध जर घातले तर गुळामुळे दूध फाटून जाईल.)

Leave A Reply

Your email address will not be published.