शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपविले जीवन

0

जळगाव ;– कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून शेतातील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील शेतकऱ्याने केला होता. अखेर त्यांचा रविवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भगवान गंभीर महाजन (वय ४५, रा.नागदूली) असे मयत इसमाचे नाव आहे. ते गावामध्ये पत्नी, दोन मुले, आई, भाऊ यांच्यासह राहत होते. शेती काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान बुधवारी दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी शेतामध्ये कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांनी भगवान महाजन यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रविवारी उपचार सुरू असताना दि. ३१ मार्च रोजी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.