फैजपूर येथे चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

जबरदस्तीने गोळ्या घशात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

0

फ़ैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

फ़ैजपूर (Faizpur) शहरातील लक्ष्मीनगर भागात गेल्या सहा वर्षांपासून दारू पिऊन मारहाण तसेच चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीने ६ जूनला तापाच्या पाच गोळ्या गळा दाबून तिला जबरदस्तीने खाऊ घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून माहिती अशी कि, चैताली नंदलाल वंजारी (वय २८) ह्या गृहिणीचा पती नंदलाल वंजारी हा रोज दारू पिऊन मारहाण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता . तसेच दि. ६ जून संध्याकाळी सहावाजेच्या सुमारास फैसपूर येथील लक्ष्मी नगर भागातील राहत्या घरात दारूच्या नशेत फिर्यादीला मारहाण करत, “आज तुला जिवंत सोडणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकी देत भिंतीवर जोरात ढकलून दिले व शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता एक हातात पीडितेचा गळा पकडून घरात असलेल्या ५,६ तापाच्या गोळ्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित विवाहितेने पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिल्यामुळे फैजपूर पोलीस ठाण्यात नंदलाल वंजारी , सासू निर्मला व सासरे बबन वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.