बापरे.. दहा कोटींचा रेडा ! सेल्फीसाठी लोकांची गर्दी

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहा कोटींचा रेडा (Buffalo) .. ऐकूनच तुम्ही थक्क झाला असाल. पण हे खरं आहे. या रेड्यासोबत  सेल्फी घेण्यासाठीही लोकांनी प्रचंड गर्दी झाली आहे. हा रेडा चांगलाच चर्चेत आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाचा (Sardar Vallabhbhai Patel Agricultural University) कृषी मेळावा (Krishi Melava) आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी हा रेडा तुम्हाला पाहायला मिळेल. हरयाणाच्या पानीपतहून हा रेडा या मेळाव्यात आला आहे. या रेड्याचं नाव गोलू आहे. पण कोट्यावधी रुपये किंमत असणाऱ्या या रेड्यामध्ये नेमकं काय विशेष आहे.

रेड्याचे मालक नरेंद्र सिंहने सांगितलं की, या रेड्याची किंमत दहा कोटी रुपये लागली आहे. त्याचा खाणंपिणं आणि देखभालीत महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. हा रेडा दररोज 25 लीटर दूध, 15 किलो फळं, 15 किलो दाणे आणि 10 किलो मटार खातो. याशिवाय त्याला हिरवा चाराही दिला जातो. दररोज संध्याकाळी त्याला 6 किमी अंतर फिरवलं जातं. त्याच्या शरीराला दररोज तेलाने मालिश केली जाते.

तसेच या रेड्यामुळे मिळणारं उत्पन्नही खूप आहे. या रेड्याची स्पर्म विकून मालक दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह बऱ्याच राज्यांत रेड्यांच्या स्पर्मला मागणी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.