अतिवृष्टीने रद्द झालेल्या परीक्षेच्या तारखा अखेर ठरल्या…!

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यात पावसाने काही दिवसांपासून थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्याचीच झाल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील बसली. त्यांचा हा परीक्षेचा काल असल्याने त्यांचे काही पेपर्स रद्द करून पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता मुंबई विद्यापीठाने रद्द झालेल्या परीक्षा १८ व १९ जुलै रोजी घेण्याचे ठरवले आहे.

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने १४ जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. या परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार १८ व १९ जुलैला होणार आहेत. अभियांत्रिकी, औषधशास्त्र, एमएससी इन फायनान्स या परीक्षेच्या नऊ विषयांची परीक्षा या काळात घेतली जाईल. परीक्षेसाठीची केंद्र तीच राहतील असेही विद्यापीठाने यावेळी स्पष्ट केले आहे.

कम्युनिकेशन स्किल्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स-१, फायनान्शियल अकाऊंटिंग अँड मॅनेजमेंट, इंटरप्रेन्युअरशीप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स अँड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा १८ जुलैला (सोमवारी) होणार आहेत. क्लिनिकल इम्युनोलॉजी अँड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा १९ जुलैला (मंगळवारी) होईल.

या परीक्षेच्या तारखेसंदर्भात समाजमाध्यमात चुकीचे संदेश पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. तारखेबाबत खात्री करण्यासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ किंवा आपल्या संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.