नरसिंहानंद यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल… गुन्हा दाखल…!

0

 

गाझियाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज देशात गटबाजी किंवा द्वेषाचे उदात्तीकरण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि उठसुठ महापुरुषांप्रती लोक प्रतिक्रियाही करत असतात. अशीच घटना ऊ.प्र (UP) मधील गाझियाबाद येथे समोर आली. महात्मा गांधी यांच्याबद्दल (Mahatma Gandhi) अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी गाझियाबादमधील दसना देवी मंदिराचे (Dasna Devi Temple) महंत यती नरसिंहानंद सरस्वती (Yeti Narasimhananda Saraswati) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंहानंद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. गाझियाबाद मसुरी पोलीस ठाण्यात (Mussoorie Police Station Ghaziabad) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

एफआयआरनुसार, महंत यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते एक कोटी हिंदूंच्या (Hindu) हत्येला महात्मा गांधी जबाबदार असल्याचं सांगतात. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदूंच्या दुर्दशेसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरलंय. 13 जुलै रोजी महात्मा गांधींविरोधात केलेल्या या वक्तव्याप्रकरणी गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 153A आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या वक्तव्यामुळं समाजातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.