एरंडोल तालुक्यात पाच तासात ७७ मिलीमीटर पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील महसूल मंडळात पावसामुळे अवघ्या पाच तासात ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतातील कपाशीसह इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बुदुक, पिपळकोठा खुर्द, पिपरी बुद्रुक, पिंपरी या चार गावांमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील काही घरे पुरात वाहून गेली. तर काही घरांचे नुकसान देखील झाले आहे. माजी जि.प सदस्य नानाभाऊ महाजन पिंपळ कोठा व पिंपरी बुद्रुक येथे जाऊन त्यांनी पूर पूर्वपरिस्थितीचा आढावा घेतला व व तेथील नागरिकांशी संवाद साधला, तहसीलदार सूचिता चव्हाण यांनी सकाळी तत्परतेने पिंपळकोठा व पिंपरी बुद्रुक येथे जाऊन त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली व नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले.

तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्यासोबत नायब तहसीलदार किशोर माळी उदय निंबाळकर, विलास धाडसे, बालाजी मुंडे सलमान तडवी, अतुल लाग सरपंच, कोतवाल, पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते. विशेषतः नदीकाठावरील घरांना पुराचा मोठा फटका बसला तालुक्यात इतर ठिकाणी सुद्धा घरांची अंशतः पडझड झाली शेती पिकांचे शेतात पाणी साचल्यामुळे मोठे नुकसान झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.