एरंडोलला राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येत्या 24 डिसेंबर 2022 शनिवारी एरंडोलला राष्ट्रीय ग्राहक दिनाचे तहसिल कार्यालयामार्फत आयोजन करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाली असल्यास अथवा तालुक्यातील शासकीय कार्यालयाबाबत तक्रार असल्यास सोडवणूक करण्यासाठी संबंधितांविरोधात लेखी तक्रार दाखल करावी असे आवाहन अ. भा. ग्राहक पंचायतचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव आणि संघटक संजय चौधरी, कार्यक़ारीणी सदस्य आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद, जावेद मुजावर, प्रा. नितीन पाटील, सदस्य डॉ. प्रशांत पाटील, नुरोद्दीन मुल्लाजी, रघुनाथ कोठावदे आदींनी केले आहे.

दि. 24 रोजी पं. स. सभागृहात सदरचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून तहसिलदार सुचिता चव्हाणा यांना ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाटबंधारे विभाग, पं. स., कृषी, टेलिफोन, एसटी, गॅस, सा. बां. विभाग, नगरपालिका, पो. स्टे, पुरवठा विभाग, वीज वितरण आदींबाबत नागरीकांच्या गंभीर तक्रारी असून संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत बजावण्यात आले आहे.

नागरीकांनी आपल्या लेखी तक्रारी तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव (मो. 9421717918) यांचेकडे अथवा सरस्वती कॉलनी म्हसावद रोड, एरंडोल येथे दि. 24 डिसेंबरच्या आत अथवा 24 डिसेंबर रोजी कार्यक्रमाच्या ठिकाणी द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.