Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महाराष्ट्र हादरला ! अल्पवयीन मुलीवर 11 जणांचा बलात्कार
    गुन्हे वार्ता

    महाराष्ट्र हादरला ! अल्पवयीन मुलीवर 11 जणांचा बलात्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीम येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध सुरु आहे.

    पीडितेने फिर्यादी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलगी माहीम येथे राहते. 16 डिसेंबर रोजी आरोपी अल्पवयीन मुलीला माहीम गावातील एका निर्जन बंगल्यावर घेऊन गेले. रात्री 8 वाजता बंगल्यावर गेल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. बंगल्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपी पीडित मुलीला माहीम बीचवर घेऊन गेले. त्यानंतर तिथेही आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. दरम्यान त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली.

    त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी करणे), कलम 341, कलम 342, 323 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यांनतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. याप्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून, 6 आरोपी फरार आहेत. 6 आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

     

    #maharashtra crime news gangrape Palghar Rape news teenage girl gangraped in palghar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif