इलॉन मस्कने उडवला ट्विटरवरील पक्षी, ‘हे’ आहेत नवीन बदल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर वरील पक्षी उडवला असून, त्याच्या जागी आता ‘X’ ची वर्णी लागली आहे. कालच्या दिवशीच इलॉन मस्कने लोगो बदलवण्याबाबत माहिती दिली होती. इलॉन मस्कला ‘X’ नावाचे ‘सुपर ॲप’ तयार करायचे आहे., जे की WeChat सारखे असू शकते. X.comवर गेल्यास ट्विटर सुरु होईल. तसेच ट्विटवरमध्ये लवकरच मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच ट्विटवर ब्रँडला आपण अलविदा करू शकतो.

ट्विटरवचा बदलला प्रोफाइल फोटो 

लिंडा कारिनोने ट्विटरवर तिच्या एका पोस्टद्वारे ट्विटरचा नवीन लोगो शेअर केला आहे. ट्विटरचा लोगो बदलण्यासाठी फक्त २४ तास लागले. दोन दिवस अगोदर मस्कने त्याच्या १४९ दशलक्ष फॉलोअर्सला X लोगो सुचविण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर डिझाईनमध्ये एक निवडून त्याचा नवीन प्रोफाइल फोटो बनविला.

ट्विटरचा नवा लोगो ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील मुख्यालयात बघायला मिळाला. सीईओ लिंडा हिने अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यालयाच्या फोटो शेअर केला आहे. ट्विटरवरील नवीन बदलांमुळे युजर्स पहिल्यांदाच नवीन गोष्टींचा अनुभव घेणार आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर, ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग आणि ऑनलाईन पेमेंट सारखे काम देखील केले आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कंपनी ट्विटर मध्ये सुधारणा होत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.