इलॉन मस्कची मोठी घोषणा, अँड्रॉईड यूजर्सनाही ‘हे’ फीचर मिळणार 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इलॉन मस्कने एक्स, म्हणजेच ट्विटरला एव्हरीथिंग अ‍ॅप बनवायचं ठरवलं आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर लाँच केलं होत. पूर्वी हे फिचर केवळ आयओएस युजर्ससाठी उपलब्ध होत. मात्र आता अँड्रॉईड यूजर्सनाही हे फीचर मिळणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व यूजर्सना हे उपलब्ध होईल.

एक्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ प्रीमियम एक्स युजर्सला हे फिचर उपलब्ध असणार आहे. या युझर्सला आपलं अ‍ॅप अपडेट करून हे फिचर मिळू शकेल. यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन ते कॉलिंगचं फीचर सुरू करू शकतील.

आपल्याला कोण कॉल करू शकत यावर युझर्सला कंट्रोल राहणार आहे. यासाठी ती ऑप्शन असणार आहे. कॉन्टॅक्ट्समधील लोक, आपण ज्यांना फॉलो करतो ते लोक किंवा व्हेरीफाईड युझर्स अशा तीन पर्यायांपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता. सोबतच ‘एनीवन’ हा पर्यायही उपलब्ध आहे. ज्यामुळे कोणताही एक्स युजर तुम्हाला फोन करू शकेल.

नवीन बेसिक प्लॅन
एक्सने याच महिन्यात आपल्या यूजर्ससाठी एक नवा बेसिक प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन व्हेरिफाईड ऑर्गनायझेशनसाठी वापरण्यात येत होता. यामध्ये 200 डॉलर्स प्रति महिना किंवा 2000 डॉलर्स प्रति वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.