लोकशाही न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन नगरपंचातींपैकी एक नगरपंचात भाजपाला राखण्यात यश मिळाले आहे. कुडाळची नगरपंचायत एका मताने गेल्याने राणे समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
आमदारकी शिवसेनेकडे असल्याने तसेच जिल्हा बँक निवडणूक चुरशीची झाल्याने जिल्हावासियांसह राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. परंतू या निवडणुकीत भाजपाला एका मताने आणि एका जागेने सत्तेपासून दुर केले आहे.
कुडाळमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. १७ जागांच्या या नगरपालिकेत भाजपाला यंदा ८ जागाच जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. यामुळे काँग्रेस या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढले आहेत. यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत जाते की भाजपासोबत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कुडाळमध्ये कविलकट्टा येथील जागा भाजपाने एका मताने गमावली आहे.
तर वैभववाडी नगरपंचात भाजपाने एकहाती जिंकली आहे. भाजपाला 9, शिवसेना 5, अपक्ष 3 अशा जागा मिळाल्या आहेत. अपक्षांपेकी दोघे हे भाजपाचेच उमेदवार होते. यामुळे हा गड भाजपानेच राखल्याचे मानले जात आहे.