जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती पत्रके वाटप

0

जळगांव ;- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव या कार्यालयच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवीन एस. टी.बस स्थानक या ठिकाणी नागरिक,विद्यार्थी यांना तंबाखू पासून होणाऱ्या विविध भयंकर आजारा बाबतीत माहिती देण्यात आली.व सोबत बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण,कायदे विषयक मोफत साहाय्य, मध्यस्ती, गर्भ लिंग निवड प्रतिबंधक कायदा,बालकांचे अधिकार या बाबत पत्रके वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम मा. अध्यक्ष सो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचा आदेशानुसार तसेच सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालय अधिक्षक श्री.एस. एन. पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आयोजन विधी सहाय्यक फिरोज शेख, व मोनाली कुमावत यांनी केले. वरिष्ठ लिपिक अविनाश कुळकर्णी, कनिष्ठ लिपिक प्रमोद ठाकरे,गणेश निंबोळकर आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.