घोडा मैदान जवळ

0

10 जून रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या 4 जागांसाठी म.वि.आ. ने राज्यातील 165 आमदारांची जुळवाजुळव करून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापन केली त्या वेळी जी स्थिती होती ती पुन्हा दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित आमदारांच्या बैठकीत सांगून टाकले आहे की, आम्ही या आमच्या वाटेला आलेल्या चारही जागा लढवू आणि जिंकूही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आहे. यात घोडेबाजार झाला नाही तर मात्र स्थिती आघाडी सरकारच्या दृष्टीने अनुकूल राहील, अन्यथा आपले हवामान खाते तसे काही वेळा अंदाज सांगतांना सपशेल फसते तसे होऊ नये. भारतीय जनता पक्षाने महाडिक या तिसऱ्या सदस्यांकरिता प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष चंद्रकांत पाटील व आशिष शेलार यांनी महाडीकांसाठी कंबर कसली आहे. आमदार प्रसाद लाड या सर्वांना मदत करीत आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 287 आमदारांपैकी महा विकास आघाडीचे 165 आमदार असल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंट हॉटेल मध्ये पार पडली. तीन आमदारांना पवई येथील खास शाही व्यवस्था ठेवण्यात आले आहे. महा विकास आघाडीचे नेते मा. शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आघाडीकडे 13 अपक्षांची मध्ये असल्याचा दावा करण्यात येतो. तर भाजपकडे 106 अधिक 7 आणि अनिश्चित 9 यामध्येच झाला तर घोडेबाजार होऊ शकतो.

केंद्रात राज्यसभेवर निवडून येताना मागील दारातून प्रवेश झाला असे गृहीत धरले जाते. लोकशाही शासन प्रणालीत वरिष्ठ सभागृह म्हटले जाते ते याच सदस्यांसाठी. जनतेमधून खासदारकी लढवून लोकसभेत प्रवेश मिळतो. याचा कालावधी संविधानिक दृष्ट्या पाच वर्षाचा असतो. राज्यसभा खासदार याचा कालावधी सहा वर्षांचा असतो. ही निवडणूक प्रक्रिया संपली की विधान परिषदेची निवडणुकीची तयारी सुरू होईल. पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते टाकताना पक्षीय बलाबल व उमेदवारांकरीता केलेले खटाटोप याचाही शेवटी कस लागतो. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीचे 3 यासाठी 45 मध्ये कोटा निर्धारित आहे. उर्वरित दुसऱ्या पसंती मध्ये संजय पवार आघाडी आणि धनंजय महाडिक भाजप यांच्यात खरी चुरस आहे. घोडामैदान जवळ आहे, आता काही तासांवर ही निवडणूक घेऊन ठेवले आहे. रात्र वैऱ्याची आहे…!

 

Leave A Reply

Your email address will not be published.