‘दसरा’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर झळकणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

नानीचा बहुचर्चित ‘दसरा’ (Dussehra) हा चित्रपट लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. येत्या २७ एप्रिलला ‘दसरा’ नेटफ्लिक्स (Netflix) या टीओटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम होणार आहे. अर्थात नेटफ्लिक्सवर तेलुगू (Telugu), तमिळ (Tamil), मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे. साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर (box office) या चित्रपटाने जबरदस्त धुमाकूळ घातला. गेल्या ३० मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांतून उतरलेला नाही. अजय देवगणच्या भोला या सिनेमालाही या चित्रपटाने जोरदार टक्कर दिली. अवघ्या सहा दिवसांत १०० कोटींची कमाई करणारा हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होताे आहे.

 

हिंदी मध्ये होणार रिलीज ?
ओटीटीवर ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन रिलीज होणार नाही. त्यामुळे चाहते काहीसे निराश आहेत. ओटीटीवर ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन कधी रिलीज होणार, याबाबत तूर्तास कुठलीही अधिकृत माहिती नाही. अद्यापही ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन चित्रपटगृहांत आहेे आणि बिझनेस करतोय. कदाचित त्यामुळे ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन काही दिवसानंतर ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.