कजगाव येथे लोक अदालत व कायदेविषय शिबिराचे आयोजन करण्यात आले

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सदरील शिबिरात ग्रामस्थांना कायद्याचे ज्ञान अवगत व्हावे तसेच लोकांना कायदेविषय माहीती शिबिरात देण्यात आली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे भडगाव तालुका विधीसेवा समिती व भडगाव वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगावच्या दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.मोरे तर जेष्ठ विधीज्ञ प्रकाश तिवारी, ॲड आर.के. वाणी, महेंद्र पाटील यांनी जागतिक आरोग्य दिन पीसी अँड पीएनडीटी व गर्भ लिंग चाचणी प्रतिबंधक कायदा १९९४, मूलभूत कर्तव्य बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार २००९, बालविवाह प्रतिबंध कायदा इत्यादी कायदेविषयक माहिती शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली.

यावेळी सरपंच रघुनाथ महाजन, ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन, भडगाव वकील संघाचे अध्यक्ष रणजित पाटील, अँड विजय महाजन, अँड मुकुंद पाटील अँड विनोद महाजन, अँड भरत ठाकरे, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी संतोष कुलकर्णी, एम.एस महाजन, अभिजित दायमा, आर.डी.माळी, कंडारे, भाऊराव पाटील, नरेंद्र विसपुते, ग्रामपंचायत सदस्य शफी मणियार, पुंडलिक सोनवणे, मांगीलाल मोरे, मंदाकिनी पाटील, नामदेव बोरसे, मनोज धाडीवाल, दिनेश पाटील, अनिल महाजन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भडगाव वकील संघाचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी केले यावेळी कजगाव ग्रामस्थ,पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी, व विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.