राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे बुधवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहे. त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब (Sapkal Knowledge Hub) येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रवाना होतील. त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रवाना होतील.

 

कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा ते सपकाळ नॉलेज हब येथे रवाना होणार असून तेथून हेलिकॉप्टरने नाशिक शहरातील पोलिस कवायत मैदानावर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून ते शासकिय विश्रामगृहाकडे रवाना होतील. यानंतर कालिदास कलामंदिरात नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने होणाऱ्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर सार्वजनिक वाचनालयातील औरंगाबाद सभागृहात होणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.