नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
डीआरडीओने पाणबुडीतून सोडले जाणारे घातक क्षेपणास्त्र (Missile) तयार केले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डीआरडीओने त्याची गुप्त चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र 402 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर यशस्वी मारा करू शकते. याने चाचणी दरम्यान प्रत्येक मिशन पूर्ण केले. याला SLCM म्हणजेच सबमरीन लाँच क्रूझ मिसाइल असेही म्हणतात.
याची रेंज 500 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
हे क्षेपणास्त्र 5.6 मीटर लांब आहे, त्याचा व्यास 505 मिलीमीटर आहे आणि वेग 0.7 मॅच आहे, म्हणजे ताशी 864 किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र टॉर्पेडो ट्यूबमधून सोडण्यात आले आहे. हे जगातील एकमेव क्षेपणास्त्र आहे ज्याची रेंज 500 किमी पर्यंत आहे आणि जे टॉर्पेडो ट्यूबमधून सोडले जाते. या क्षेपणास्त्राचे दोन प्रकार आहेत. एक जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र आणि दुसरे जहाजविरोधी क्षेपणास्त्र. शत्रूच्या ताब्यातही येत नाही. त्याच वेळी, त्याचे लक्ष्य देखील अचूक आहे.
भारताकडे सध्या एक आण्विक पाणबुडी आणि सुमारे 16 सामान्य पाणबुड्या आहेत. आता शत्रू समुद्रातून काहीही करण्यापूर्वी विचार करेल. कारण आता भारताकडे पाणबुडीवरून मारा करणारे धोकादायक क्षेपणास्त्र आहे.