डॉ. शारदा अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती…

0

 

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीश अग्रवाल यांच्या पत्नी डॉ.सौ.शारदा नितीश अग्रवाल यांची सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात झाली आहे. नियुक्तीचे पत्र सामान्य रुग्णालय खामगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी दिले.

डॉ. शारदा अग्रवाल या एम. एस. गायनिक असून जोखीमीची प्रसूती, सोनोग्राफी, बिन टाक्याची शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढणे, वंध्यत्व निवारण, इत्यादी स्त्रीरोग उपचारांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे.

यापूर्वी त्यांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटल पुणे, फर्नांडिस हॉस्पिटल हैदराबाद, चिकित्सा सोनोग्राफी सेंटर मुंबई  इत्यादी ठिकाणी सेवा दिल्या आहेत. खामगाव शहरात राहून परिसरातील सामान्य गरजू रुग्णांची सेवा करण्याचा मानस यावेळी डॉ.शारदा अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.