नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी…

0

 

प्रवचन सारांश, 08.10.2022

 

नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी होय. नऊपद ओली साधना करून अनेकांनी आपल्या जीवनाचा उद्‌धार केलेला आहे. पुण्यवाणी वाढविणारी नऊपद ओली आराधना आहे; ती आराधना प्रत्येकाने करायला हवी असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले.

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरु आहे.

श्रीपाल चरित्राच्या आजच्या प्रवचनात पुढील कथासूत्र सांगितले. रूप किंवा कला जीवनात काय महत्त्वाचे असते याची प्रचिती श्रीपाल यांना घ्यायची होती. श्रीपालच्या पुण्यप्रभावामुळे त्याला मनोइच्छीत काम करू शकेल असा एक हार भेट म्हणून मिळतो. त्या हाराच्या प्रभावामुळे श्रीपाल याला क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, रुप बदलणे इत्यादी मनोइच्छीत कार्ये करता येत होते.  गुणसुंदरी राजकुमारी हिचे स्वयंवर असते व जी व्यक्ती उत्तम विणा वादन करेल तिच्याशी त्याचा विवाह लावला जाईल असे ठरलेले असते. श्रीपाल एका कुबड्याचे रुप धारण करतो. त्याच्या रुपाची सर्वच चेष्ठा करतात. परंतु तो मुर्छित राग व जागृत राग पेश करून सर्वांना चकीत करतो. मूर्छित राग आलाप करून तो सर्वांना मुर्छित करतो व त्या वेळात सर्वांच्या अंगावरील दागिने काढून त्याचा ढिग राजदरबारात लावतो व थोड्यावेळाने जागृत राग आळवतो व सर्व चकीत होतात. त्याचे कौशल्य पाहून गुणसुंदरीचा विवाह कुबडे रूप असलेला श्रीपाल यांच्याशी होतो. हार च्या प्रभावामुळे  श्रीपाल आपल्या मूळ रुपात येतो अशी श्रीपाल चरित्राची पुढील कथा डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांनी नऊपद ओलीच्या आठव्या दिवसाचे प्रवचन दिले.

 

श्रीपाल याला पुन्हा राजकुमारी तिलोकसुंदरीच्या स्वयंवरात जावे असे सांगण्यात आले. श्रीपाल तिथे वरला जातो त्याला विवाह तिलोकसुंदरी राजकुमारीशी होतो. राजकुमारी श्रुंगारसुंदरी व तिला पाच मैत्रिणी यांचे कोडे/प्रश्न सोडविणाऱ्याशी दलपतनगरच्या राजकुमारी व तिच्या पाच मैत्रिणींशी होईल अशी अट असते. त्यांचे प्रश्न कोणीही सोडवू शकत नाही. श्रृंगारसुंदरी व तिला मैत्रिणी हे कोडे किंवा प्रश्न व उत्तरे म्हणजे जीवन सुंदर सफल करण्याचे मार्ग होय. त्यामुळे हे सहा प्रश्न नीट समजावून घ्या असे प्रवचनात सांगण्यात आले. श्रुंगारसुंदरीचा शेवटचा प्रश्न ‘सूर्याला आधी काय उगवते?”  हा असतो. त्यावर श्रीपाल उत्तर देतात ‘यश’ सूर्याच्या आधीच उगविलेले असते. श्रीपाल यांचा विवाह राजकुमारी व तिच्या पाच मैत्रिणींशी झाला. राधावेथ धनुर्विद्या या विषयीचा राजकुमारी प्रण लावते. त्यात देखील श्रीपाल जिंकतात त्यामुळे श्रीपाल यांचा आठवा विवाह जयसुंदरीशी होतो. १२ वर्षे बाहेर राहून झाले. पहिली राणी मैनासुंदरी हिला १२ वर्षानंतर भेटणार या वचनाची आठवण श्रीपाल यांना होते. ते आपली सर्व संपत्ती व राणी यांना घेऊन आपल्या नगरी पोहोचत असता … वाटेत एका नगरीत राजकुमारीचा सर्प दंशाने मृत्यू झालेला असतो. ते श्रीपाल याला समजते त्याच्याजवळ हार असल्याने त्याला ज्ञान होते की ती राजकुमारी जिवंत आहे.  ती कन्या तर जीवंत आहे असे श्रीपाल सांगतो. राजाला ही आनंदाची गोष्ट समजली की आपली राजकुमारी तिलकसुंदरी जीवंत आहे. पुढे श्रीपाल चरित्रात काय घटना घडतात? पुढच्या भागात ते ऐकता येईल व या नऊपद ओलीचे महत्त्व काय ते ऐकण्यासाठी स्वाध्यायभवनला नक्की यावे असे आवाहन करण्यात आले. नऊपद ओली आराधनेचा ९ ऑक्टोबर रोजी समापन होण्याचा दिवस आहे.

भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही केले गेले…

———□■□■ ———

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

 

Leave A Reply

Your email address will not be published.