घरगुती गॅसचा काळाबाजार; तिघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील बळीरामपेठमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणावर शनिवार, १७ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी इलेक्ट्रीक मोटार, रेग्युलेटर, नळ्या व रिकामे सिलेंडर तसेच दोन ऑटो रिक्षा असा एकूण ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील बळीरामपेठे येथे गंगूबाई शाळेच्या मागे एका लोखंडी पत्र्याच्या टपरीमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे वापर केला जात असून वाहनांमध्ये भरुन त्याचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. या गुप्त माहितीनुसार शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी छापा टाकून कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी गॅस भरण्यासाठीचे इलेक्ट्रीक मोटार पंप, रेम्युलेटर नळ्या रिकामे सिलेंडर तसेच दोन ऑटो रिक्षा असा एकूण ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरुन फिरोज खान सलीम खान (वय २८, रा. काट्या फाईल), पंडीत शिवराम शिरसाळे (वय ५७, रा. शिवाजीनगर), व शेख खालीद शेख शफी (वय २४, रा. गणेशपुरी, मेहरुण) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.