सोफा सेटमध्ये आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं रहस्य उघड; अतिप्रसंगाला विरोध केल्यानं हत्त्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

डोंबिवली; येथे दावडी परिसरात एका इमारती मध्ये सुप्रिया शिंदे या  महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला.

मात्र काहीच सुगावा नसल्याने आरोपी शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकले होते. तपासा दरम्यान साक्षीदारांनी हत्या झाली. त्या वेळेत सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

विशाल घावट असं या आरोपीचे नाव असून विशाल हा शिंदे यांचा शेजारी आहे. पुस्तक देण्याच्या बहाण्याने तो घरात शिरला. सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सुप्रियाने प्रतिकार केला. याच प्रतिकार दरम्यान विशालने तिची निर्घृण हत्या केली.

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये कीशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आपल्या मुलासह  राहत होते. 15 फेब्रुवारी रोजी  किशोर शिंदे सकाळी कामावर गेले सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेले याच दरम्यान घरी असलेल्या नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सुप्रिया हिचा गळा आवळून  हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोणताही सुगावा नसल्याने हत्या का व कुणी केली, आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकलं होतं.  तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचा पोलिसांना सांगितलं.

हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चपल कोणती हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल गावडे याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.

15 फेब्रुवारी  रोजी त्यावेळी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता व पती कामावर निघून गेले होते. सुप्रियाला वाचनाची आवड असल्याने  विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

सुप्रियाने त्याला प्रतिकार केला. यावेळी विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर आपटलं. त्यानंतर टायने गळा आवळून तिला ठार मारले व तिचा मृतदेह त्याच्या घरातील सोफासेट मध्ये लपवून ठेवला. धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले.

त्या वेळेला विशाल हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. पोलिसांनी या प्रकरणात काहीही सुगावा नसताना फक्त चपले वरून आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचा देखील आवाहन केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.