दिशा पटणीचा गंगा आरती करतांनाचा व्हिडीओ वायरल, नेटकरी करताय तुफान ट्रोल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिशा पटणी ( Disha Patani )नेहमीच तिच्या वेगळ्या अंदाजात बघायला मिळत असते. कधी तीला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) वरून ट्रोल केले जाते तर कधी तोडक्या कपड्यांमुळे, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील अतिशय फिट, हॉट अँड बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पार्टी, लग्न किंवा अवॉर्ड सोहळा असो दिशा नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. यामध्ये ती वाराणसीमध्ये (Varanasi) गंगा आरती (Ganga Aarti) करताना दिसत आहे. मात्र गंगा आरती करतानाही तिने काय कपडे घालावे हेही तिला कळालेलं नाही. दिशाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्वेटपँट घातली आहे. यावर तिने शाल ओढलेली दिसते. तिच्या याच लुकवरुन ती ट्विटरवर प्रचंड ट्रोल होत आहे.

काय म्हणाले नेटकरी
‘दिशाला सूटमध्ये पाहण्याची इच्छा इच्छाच राहिली’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा म्हणतो, ‘पू बनी पार्वती’. दिशाला बरेचदा नेटकऱ्यांनी बिकीनी आणि इतर बोल्ड कपड्यातच पाहिलं आहे. तिने एखादेवेळी साडी जरी नेसली तरी ती साडी देखील फॅशनेबल आणि अंगप्रदर्शन करणारीच असते. आता गंगा आरती करताना तरी दिशाला फॅशन सेन्स नको का असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.