धक्कादायक; अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शुक्रवारी रात्री अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसने आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी लखनऊ-गोरखपूर (Lucknow-Gorakhpur accident) महामार्गवरून वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील काही प्रवाशी बाहेर फेकले गेले, तर काही जण ट्रकखाली दाबले गेले. यात ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

 

शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमींना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटना लखनऊ-गोरखपूर महामार्गावर (Lucknow-Gorakhpur Highway) झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तर घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना वाचवण्याचे काम सुरू केले.

Leave A Reply

Your email address will not be published.