धुळ्यात एकाच रात्री दोन जणांनी गमावला जीव, वाचा सविस्तर

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे शहरात तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याच रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपस सुरु करण्यात आला आहे.

धुळे शहरात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रात्री तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्याच परिसरात आज सकाळी तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लडविले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पोलीस प्रशासनातर्फे डॉग पथकासह इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस प्रशासनातर्फे या दोन्ही तारू-तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा कसून, तपास केला जात आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे हा तपास केला जात असून, एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.