घाडवेल येथील दीपेश पाटील यांचा दिल्लीत होणार सत्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोरगाव ता. रावेर याबाबत सविस्तर वृत्त असे की घाडवेल ता. चोपडा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विभागीय समन्वयक दिपेश समाधान पाटील यांच्या “NATIONAL ICON AWARD 2023” हा पुरस्कार देऊन गृह मंत्री अमीत शहा ह्यांचा हस्ते दिल्लीमध्ये सत्कार करण्यात येणार आहे.

घाडवेल ता. चोपडा गावातील दिपेश समाधान पाटील हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या माध्यमातुन रुग्ण सेवा करतात . आता पर्यंत अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार या योजनेतून त्यांनी बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचविले. काही इतर मदत असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत असेल अशी अनेक प्रकारे ते आलेल्या गरीब रुग्णांची मदत करीत असतात. गेल्या ६,७ महिन्यात ज्यांना ज्यांना मदत लागली त्यांना त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचा माध्यमातून मदत मिळवून दिली .आता पर्यंत 28 लाख 95 हजार रुपये मदत मिळवून दिली आहे . या त्यांच्या सेवेमुळे मुळे अनेक रुग्णांचे प्राण देखील वाचले आहेत. कधीही कुणालाही आरोग्याच्या प्रश्नावर मदत लागत असेल तर दीपेश पाटील आवर्जून त्या रुग्णांना मदत करतात व सतत करीत आहेत आहे. “BHARAT NEWS” ह्यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील पुरस्काराचे आयोजन दिल्ली येथे केले आहे.

ह्या पुरस्कार सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा, 17 वे चीफ मिनिस्टर उत्तरप्रदेश व मेंबर ऑफ parliament श्री.जगदंबिकापल, श्री.रवी किसन m.p अँड बॉलिवूड ॲक्टर,श्री.सतीश द्विवेदी शालेय शिक्षण मंत्री उत्तर प्रदेश, श्री . अर्जुन राम मेघवाल लॉ अँड जस्टिस मिनिस्टर ऑफ इंडिया, श्री. जय प्रताप सिंग आरोग्य मंत्री उत्तर प्रदेश ह्या अश्या बड्या नेत्यांचा हस्ते ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे . दिनाक 5 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे. दीपेश पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे व त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.