ऐन लगीनसराईच्या हंगामात सोने चांदीला झळाळी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होतांना दिसत आहे. त्यातच आता लगीनसराईचा हंगाम सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

सोने वायदा बाजारात 61,074 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. त्यानंतर त्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 61031 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 72,960 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली. त्यानंतर त्याच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली आहे आणि ती कालच्या तुलनेत 131 रुपयांनी म्हणजेच 0.18 टक्के वाढीसह 72,957 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. काल चांदी 72,826 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

जळगाव सराफा बाजारात सोन्याचा भाव 62,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा भाव 74,500 रुपये किलोवर आहे.

सोने (24 कॅरेट) आणि चांदीचे दर 

दिल्ली- सोने 62,170 रुपये, चांदी 76,000 रुपये

मुंबई-  सोने 62,020 रुपये, चांदी 76,000 रुपये

कोलकाता-  सोने 62,020 रुपये, चांदी 76,000 रुपये

चेन्नई- सोने 62,600 रुपये, चांदी 79,000 रुपये

नोएडा- सोने 62,170 रुपये, चांदी 76,000 रुपये

जयपूर- सोने 62,170 रुपये, चांदी 76,400 रुपये

लखनौ- सोने 62,170 रुपये, चांदी 76,000 रुपये

पाटणा-  सोने 62,070 रुपये, चांदी 76,000 रुपये

गाझियाबाद- सोने 62,170 रुपये, चांदी 76,000 रुपये

पुणे-  सोने 62,020 रुपये, चांदी 76,000 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.