धोनीच्या जर्सी क्रमांक ‘७’ बद्दल बीसीसीआयचा मोठा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रात खळाडूंनी क्रमांक ७ ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक ७ च्या भोवती एक दिग्गजत्वाचं वलय निर्माण केलं. आता बीसीसीआयने या जर्सी क्रमांक ७ या बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

धोनीने जर्सी क्रमांक ७ आता निवृत्त होत आहे. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांचा जर्सी क्रमांक निवडतांना तो ७ निवडू नये अशी सूचना केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक १० हा देखील यापूर्वीच निवृत्त केला आहे. आता धोनीचा जर्सी क्रमांक ७ देखील निवृत्त करून धिनीच्या एकमेवाद्वितीयत्वावर शिक्कमोर्तब केलं. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले असून आता कोणताही भारतीय क्रिकेटपटू जर्सी क्रमांक 7 परिधान करू शकणार नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.