धानो-यात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कडून रास्ता रोको आंदोलन

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गावरील धानोरा बसस्थानक परीसरात राष्ट्रवादी कडून विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने दोन महीन्यांपूर्वी धानोरा येथे १३२/ केव्ही चे सबस्टेशन मंजुर झाले होते. काम सुद्धा सुरु झाले, परंतु विघ्नसंतोषी लोकांनी ठेकेदाराला मारहाण केली.यामुळे संबंधित ठेकेदार हा सर्व सामान घेऊन पळ काढावा लागला. बंद पडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. तसेच कापसाला १२ हजार भाव मिळावा,अशा विविध मागण्यांसाठी दि २३ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.तरी या आंदोलनात माजी सभापती यांनी सरकारवर व आमदारावर सडकून टिका केली.

२० टक्याच्या कमीशनसाठी जर कामे बंद पडतील तर काय उपयोग ज्या विघ्नसंतोषी लोकांनी ठेकेदारा मारहान केली त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी माजी सभापती डि.पी. साळूकेसर यांनी केली. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, घनश्याम पाटील, उपसभापती सुर्यकांत खैरनार, माजी – सरपंच प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प. चे माजी सदस्य बाळासाहेब पाटील जयसिंग पाटील, रविद्र पाटील कैलास पाटील व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.