कारने दिली कंटेनरला धडक, १ ठार तर १ जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

समृद्धी महामार्गावर कारने कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर, एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात वाशिमच्या मालेगाव तालुकयातील लोकेशन क्रमांक २३४ वर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या पघाताची पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार पुण्यावरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात चालत्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

या अपघातात शकील पठाण (वय २७) हा जागीच ठार झाला, तसेच अनिकेत चंदू जाधव (वय २८) हा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोकेशन १०८ मालेगाव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यातील पायलट आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.