रोहित शेट्टीने शेअर केला ‘सिंघम अगेन’मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’बाबत प्रेक्षकांना भरपूर सारी उत्सुकता आहे. अजय देवगण स्टारर या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग केमिओ रोल करणार आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने घोषणा केली होतीकी, या चित्रपटात दीपिका पादुकोण लेडी सिंघमची भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यासोबतच आता दीपिकाचा या चित्रपतील फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रीची जबरदस्त स्टाईल दिसत आहे.

रोहित शेट्टीने सिंघम अगेनमधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. रोहित शेट्टीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, स्त्री हे सीतेचे रूप आहे आणि दुर्गेचेही… भेटा आमच्या पोलिसातील सर्वात क्रूर आणि हिंसक अधिकारीला… शक्ती शेट्टी! आमची लेडी सिंघम…दीपिका पादुकोण!’ रोहित शेट्टीच्या या पोस्टवर दीपिकाचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगने जबरदस्त कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये असे लिहिले की, ‘अरे देवा…आली रे आली|’

 

Leave A Reply

Your email address will not be published.