कजगाव येथे उष्मघाताने तरुणाचा मृत्यू….

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कजगाव (Kajgaon).ता.भडगाव, येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्म घाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९) याला दिनांक १३ रोजी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उष्मघाताने अचानक त्याचा मृत्यू झाला. नेहमी हिरारीने मित्रांच्या गोतावळ्यात राहणारा हसतमुख तरुण मुलगा अचानक गेल्याने कजगाव परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत तरुणांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे मयत अक्षय हा सुवर्णकार समाजचे माजी अध्यक्ष-रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता. त्याच्यावर दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता कजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मे हिटच्या (May hit) तडाख्याने सध्या जिल्ह्याला हैराण करून सोडले आहे दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढत चालले असल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे त्यात आता एका तरुणाचा उष्मघाताने दुदैवी मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.