पाचोरा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नाहीच, गोरगरीब नागरिकांची होतेय गैरसोय

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

सुमारे ७० ते ८० हजार लोकसंख्या असलेल्या व गोरगरिबांची आरोग्याला संजीवनी देणाऱ्या पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून केवळ अॉपरेशन थिएटरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत रुग्णालयात भला  मोठा स्टाप असतांनाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होत नसल्याने नागरीकांना जादा पैसे मोजून खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागत असल्याने पाचोऱ्यात अनेक विकासाचे प्रकल्प होत असतांना लोकसंख्या वाढीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून या किरकोळ तांत्रिक कारणामुळे नागरीकांना वेठीस धरले जात असल्याने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्व सामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाचोरा तालुक्यात पिंपळगाव (हरेश्वर) व पाचोरा येथे असे दोन ग्रामीण रुग्णालय असून वरखेडी, लोहारा, नांद्रा, लोहटार व नगरदेवळा असे पाच प्राथमिक रुग्णालये आहेत. नगरदेवळा व नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नविन इमारतीचे गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून केवळ लोहारा, वरखेडी, लोहटार या प्राथमिक आरोग्य केंद्रासह पिंपळगाव (हरेश्वर) याच ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जात आहे. यातही पिंपळगाव-हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा अतिशय कमी प्रयत्न केला जात असल्याने वर्षं भरात केवळ २२ शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात वरखेडी (१७७) नगरदेवळा (१७०) लोहटार (१३३) लोहारा (९८) तर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात केवळ (१५) शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

पाचोरा शहर हे सुमारे ७० ते ८० हजार लोकसंख्या असलेले शहर असून या ग्रामीण रुग्णालयात संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गोंदेगांव, बनोटी, पळाशी, हनुमंतखेडा, वरठाण, पहुरी, वणगांव, निंभोरा, म्हसीकोठा तर भडगाव तालुक्यातील अंतुर्ली नं. ३, भातखंडे, अंजनविहिरे, एरंडोल तालुक्यातील उत्राण, तळणी सह परीसरातील नागरीक उपचारासाठी येत असतात एकीकडे पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याची शक्यता असतांना मात्र किरकोळ तांत्रिक कारणामुळे नागरीकांना वेठीस धरले जात असल्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तातडीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. पाचोरा येथील तालुका वैद्यकीय कार्यालयाकडून नुकतीच ग्रामीण रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली असून या ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचे वृत्त आहे.

डॉ. समाधान वाघ यांनी १५ हजार शस्त्रक्रिया केल्याचे होतेय कौतुक
पाचोरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी ८ जून २०१५ रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दर वर्षी तीन ते चार हजार कुटुंबे नियोजन शस्त्रक्रिया करुन मोठा आलेख चढविल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बेस्ट डॉक्टर पदवी बहाल करुन सन्मानित केले होते. डॉ. समाधान वाघ यांनी पाचोरा तालुक्यातील पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) ग्रामीण रुग्णालयात वरखेडी, लोहारा, नांद्रा, नगरदेवळा, लोहटार, भडगाव तालुक्यात भडगाव, कजगाव, गुढे, पिंपरखेड, चोपडा तालुक्यात चोपडा, चाहार्डी, वैजापूर, हातेड, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, वाकोद, सह अन्य ठिकाणी आठ वर्षात १५ हजार कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.