धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

कजगाव रेल्वे स्थानका नजीक रेल्वे खंबा कि. मी. क्रं. 347 / 4 A अपट्रॅक वर कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ५ मे रोजी घडली आहे.

मृत अनोळखी इसमाचा अंदाजे वय ४५ वर्ष असुन मयताची उंची ५ फुट ५ इंच, गौरवर्ण, शरीर बांधा मजबुत, डोक्याचे केस काळे, दाढीचे केस बारिक, उजव्या हातावर A K माॅं असे गोंधलेले तसेच अंगावर आकाशी निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे.

सदर मयता विषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९८९०६३३४३५ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रेल्वे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे ए. एस. आय. सुभाष मांगो बोरसे हे करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.