माजी मंत्री दशरथ भांडे व आदिवासी कोळी समाज आंदोलन समन्वय समितीच्या प्रयत्नाला येणार यश

शासनाचा सुधारित शासन आदेश आमच्या पर्यंत येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

0

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क

१० ऑक्टोबर २०२३ पासुन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी कोळी समाज बांधव व महिला भगिनी आमरण अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्याचा १४ दिवसापर्यत शासनाचे कडुन कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय होत नसल्यामुळे, माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथजी भांडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण करणाऱ्यांची विचारपुस करुन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागे १३ ऑक्टोबर २०२३ रोजी या उपोषणाच्या जात प्रमाणपत्र व वैधतेच्या बाबतीत माजी मंत्री डाँ.दशरथ भांडे व आदिवासी कोळी समाज आंदोलन समन्वय समिती जळगाव जिल्ह्याच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांचे सोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.

या बैठकीत निर्णय झाला बैठक झाल्यानंतर दोन दिवसांनी प्रत्येक प्रांत अधिकारी मार्फत दिवसाला ६० जात प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाने देण्याचे जाहीर केले होते. परंतु मीटिंग होऊन आज पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यावर तशी काही कारवाई होताना दिसत नसल्यामुळे, प्रशासनाला जाब विचारण्या करीता पुन्हा आदिवासी नेते डाँ.दशरथजी भांडे व आंदोलन समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भांडे साहेबांना बघून जो निर्णय मागील आठवड्यामध्ये बैठकीमध्ये झाला होता. त्याबाबत सविस्तर सांगितले व त्यानुसार आज रोजी आमच्याकडे जात प्रमाणपत्र तयार असल्याचे सांगितले. माननीयआयुष प्रसाद यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या कडून जात प्रमाणपत्र देणेबाबत बाबत कुठलीही अडवणूक होणार नाही.

जळगाव जिल्हाधिकारी यांनी जात प्रमाणपत्राच्या बाबतीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार लगेच जळगाव जिल्ह्यामधील विविध तालुक्यातील प्रांताकडून प्रत्यक्ष अर्जदाराला फोनद्वारे संपर्क साधला गेला व तुमचे जात प्रमाणपत्र घेऊन जा, असा संदेश दिला गेला. हा फार मोठा विजय आजच्या महत्वपूर्ण बैठकीचा व आंदोलन समन्वय समिति, अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेल्या सर्व आठ शिलेदार व दोघ भगिनींचा खूप मोठा विजय आहे.

प्रभाकर सोनवणे, अध्यक्ष जितेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व शिष्टमंडळाचे पदाधिकारी
अनिल नन्नवरे, रविंद्र नन्नवरे, ज्ञानेश्वर कोळी, मंदा सोनवणे, आशा सपकाळे, प्रतिभा सोनवणे, ॲड विनोद सोनवणे, दिपक कोळी, गंभीर उन्हाळे, मंगला कोळी, मालती कोळी, रविंद्र तायडे, पांडूरंग कोळी, विनोद कोळी, संजय मोरे, योगेश बाविस्कर, मनोहर कोळी, शांताराम कोळी, भिका कोळी, मंगल कांडेलकर, नामदेव कोळी, योगेश्वर कोळी, यांच्यासह आदिवासी कोळी जमातीचे समाज बांधव महिला भगीनी कर्मचारी बांधव विद्यार्थी युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.