डांभुर्णीचे दिनेश सोनवणे ( पाटील ) यांची मुंबई ब्राँचच्या सीआयडी एसीपी पदावर पदोन्नती

0

यावल ;- तालुक्यातील डांभुर्णी येथील राहणारे व स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व संदीप सोनवणे यांच्या परिवारातील त्यांचे मोठे बंधु दिनेश निंबाजीराव सोनवणे (पाटील) यांची पदोन्नती होऊन त्यांनी मुंबई CID येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)पदाचा पदभार घेतल्या बद्दल दिनेश सोनवणे ( पाटील )यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .

दिनेश सोनवणे यांचा पोलीस प्रशासनातील कार्यकाळ हा अत्यंत रोमांचकारी राहीलेला आहे त्यांनी प्रशासकीय सेवा बजावतांना अनेक जिकरीच्या व लक्ष वेधणाऱ्या कामगिऱ्या यशस्वी पार पाडल्या आहे . महाराष्ट्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी सेवा बजावलेली आहे नुकतेच ते गोंदिया येथे कार्यरत होते.तेथून पदोन्नतीवर बदली होऊन ते आता देशाच्या आर्थिक राजधानीत CID सारख्या अत्यंत जबाबदार व महत्त्वाच्या पोलीस ब्रांचला सेवा देतील..
त्यांनी पोलीस दलात केलेल्या चांगल्या कामगिरी मुळे स्वयंदीप प्रतिष्ठानने त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.