गोंडगाव येथे चोरट्यांचा दोन घरांवर डल्ला

0

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर व अंगणवाडी फोडून काही ऐवज लांबवला. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत.

गोंडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून दोन डॉक्टरांची घरे व एका अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ७ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गोंडगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर गल्लीतील दोन डॉक्टरांची घरे व अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरी करुन पोबारा केला. यातील डॉ. जाधव हे देव दर्शनासाठी गेल्याने त्यांचे बंद घराचे कुलूप तोडत घरातील ऐवज लांबवला. मात्र, नेमकी काय व कितीची चोरी झाली आहे,

याचा खुलासा झाला नाही. दरम्यान, इतर दोन ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांना खाली हाथ परतावे लागले. तर १ रोजी रात्री रघुराज मेडिकल व गजानन ज्वेलर्स हे सराफ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठा ऐवज लांबवला आहे. नियमीत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.