सोशल मीडियावर तरुणीचे बनावट खाते तयार करून बदनामी ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीच्या इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाउंटवर बनावट खाते तयार करून तरुणीचा फोटो वापरून बदनामीकारक मेसेज टाकून आणि अश्लील स्टिकर लावल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , शहरातील एका भागात राहणाऱ्या 21 वर्षे तरुणीचे अकाउंट असून 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने तरुणीच्या नावाचा व फोटोचा वापर करून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट इंस्टाग्राम खाते तयारकेले. तसेच तरुणीचे बदनामीकारक मेसेज टाकून व त्याला एडिट करून अश्लील प्रकारचे स्टिकर लावून तरुणीचा फोटो इंस्टाग्राम खात्याच्या स्टोरीवर ठेवून तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणीने 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला बनावट खाते तयार करून बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.