सद्यस्थिती

0

लोकशाही, विशेष लेख

 

आजच्या या २१व्या शतकात
जगावे कसे हे कळेनासे झाले
ट्रेण्डनुसार सर्व काही येथे
मात्र फारच बदलू लागले

बदलला माणूस बदलली
सारी जीवनशैली
संगणकाच्या या जगात तंत्रज्ञानाच्या
वृक्षाला ग्रीष्मातही पालवी फुटली

नाती गोती झाडाच्या
पिकल्या पानाप्रमाणे गळून पडली
घर झाली मोठी मात्र
माणसं चारच राहिली

भरपूर पदव्या पण मान
अपमानाची ठेवी गेली वाहिली
धाव सारी यशप्राप्तीसाठी
मानवता मात्र ढासळली

गेले ते दिवस राहिल्या आठवणी
असं म्हणायला हरकत नाही
पण न सांगता गप्प ही
तर राहता येत नाही

शेवटी एवढेच म्हणेल,
आधी डोंगरकपार्‍यातदेखील एखाद्या
घर दिसायचं झाडात लपलेलं
आज घर तर दिसतात फार आणि
त्यात एखादं झुडुप मात्र हिसमुसलेलं

शुभांगी हिवरखेडे
मो. 9284512314

Leave A Reply

Your email address will not be published.