बापरे.. दहावीच्या विद्यार्थ्याकडे हॉलतिकिटसाठी मागितले ३० हजार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद; औरंगाबाद शहरात दहावी परीक्षेच्या हॉलतिकिटासाठी विद्यार्थ्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

आजपासून दहावीची परीक्षा सुरु झालीय, पण परीक्षेआधी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकिटसाठी अडवून त्यांच्याकडून पैसै मागणाऱ्या संस्थाचालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जवळपास दोन वर्षानंतर दहावीच्या परीक्षा ऑफलाइन होत आहेत. अशा परिस्थितीत हॉल तिकिटसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थाचालकाला अटक केली आहे. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एसपी जवळकर असे त्यांचे नाव आहे.

त्यांनी एका विद्यार्थ्याकडे हॉलतिकिट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्यांना अटक केली. जवळकर यांच्यासह शाळेतील लिपिक सविता खामगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून तब्बल १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या लेखी पेपरसाठी ३० मिनिटे आणि ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वेळ जास्त असणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.