तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील गेंदालाल मील परिसरात ‘माझ्या सोबत का राहत नाही’ असे बोलून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गौरव जगन साळुंखे (वय २०, रा. गेंदालाल मिल परिसर जळगाव) हा तरूण हमाली काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र जुबेर भिकन उर्फ डबल हा जवळ येवून तू माझ्या सोबत का राहत नाही असे बोलून गौरव साळुंखेच्या डोक्यावर बिअरची बाटली मारली. त्या गौरवच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. तसेच गौरवला अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार माण्याची धमकी दिली.

जखमीवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मंगळवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता गौरवच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जुबेर भिकन उर्फ डबल याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.