जळगावात मेडिकल दुकान फोडले ; ७ हजारांची रोकड लंपास

0

जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून शटर अर्धवट उघडून चोरट्यांनी मेडीकलमध्ये डल्ला मारला. ही घटना आर. आर. शाळेजवळ दि. ४ रोजी सकाळच्या सुमारास उडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी सात हजारांची रोकड लंपास केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिजाऊ नगरात कुणाल आनंदा पाटील हे वास्तव्यास असून त्यांचे आर. आर. शाळेसमोर कुणाल फार्मा नावाचे मेडीकल आहे. दि. ३ मार्च रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडले. परंतु रविवार असल्याने त्यांनी दुपारच्या सुमारास दुकान बंद करुन ते घरी निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊवाजेच्या सुमारास त्यांच्याकडे कामाला असलेले विजय पाटील यांनी त्यांना फोन करुन तुमच्या मेडीकलच्या दुकानाचे शटर उघडे असून त्याला लावलेली कुलूप तुटलेले असून ते समोरील गटारीत फेकलेले आहे.

दरम्यान, कुणाल पाटील यांनी तात्काळ दुकानावर येवून पाहणी केली असता, त्यांना दुकानातील ड्रॉवर उघडे दिसले. तसेच त्यातील ७ हजारांची रोकड आणि दोन पेनड्राईव्ह दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी बुधवारी सकाळी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.