जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा होणार सुरू- खा. उन्मेष पाटील

0

फ्लाय 91 कंपनीला डिजीसीए कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) प्रदान

जळगाव – भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन (DGCA) यांनी फ्लाय नाईन्टी वन (Fly 91) कंपनीला आजच सर्व परवानग्या पुर्ण झाल्याने डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC)

पत्र देण्यात आलेअसून लवकरच फ्लाय 91 कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.

गेल्या पंधरवड्यात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी डीजीसीए चेअरमन विक्रम दत्त आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे,हैदराबाद व गोवा प्रवाशी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भामध्ये सात्तत्याने पाठपुरावा केला होता.आज अखेर या सर्व परवानग्याचे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले असून पुन्हा एकदा जळगाव विमानतळावरून विमान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

दळणवळणास मिळणार गती

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने जळगाव विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. या विमानतळावरून नाईट लँडिंग ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र या सुविधांच्या माध्यमातून जळगाव विमानतळ हे देशाच्या विमानतळाच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणार आहे.आज दीर्घ प्रतिक्षेनंतर फ्लाय 91 एअर लाईनला डिजीसीए कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र AOC मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.