Sunday, May 29, 2022

चक्क.. भंगारात विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नागपूर:शहरातील कबाड्याने भंगारमध्ये जुनी कार विकत घेतलेल्या  कारच्या डिकीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

- Advertisement -

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली. त्याच्या गोदाम परिसरात ती पडून होती. शुक्रवारी सकाळी ती कापण्यासाठी तो आणि त्याच्याकडे काम करणारे कार जवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात मृतदेह आढळला.

ही माहिती त्यांनी तहसील पोलिसांना कळविली. त्यानंतर ठाणेदार तृप्ती सोनवणे आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. आरोपींनी हत्या करून कारच्या डिकीत मृतदेह लपवला असावा, असा संशय आहे. वृत्त लिहिस्तोवर मृतकाची ओळख पटली नव्हती

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या