एमआयडीसीतील कंपनीतुन दीड लाखांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एमआयडीसी एरियातील एका कंपनीत खड्डा खोदून जवळपास दीड लाखांचा ऐवज लांबवून दारू पिऊन ऐश करणाऱ्या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आणल्या आहेत. त्यांनी मौजमजा करण्यासाठी हि चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यांना मंगळवारी न्यायाधीश जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (रा. रामेश्वर कॉलनी) हा एच.डी.फायर कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून काम सोडून गेल्याने त्याने त्याचे मित्र ईश्वर श्रावण महाजन ३४, विक्की आत्माराम कोळी (३२) व दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

एमआयडीसी एरिया एच.डी.फायर कंपनीच्या संरक्षक भिंती खाली खड्डा खोदून तिघांनी मंगळवार, २ मे रोजी मध्यरात्री कंपनीमध्ये प्रवेश करून त्यानंतर १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या पट्टया चोरल्या . . या प्रकरणी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

हे तिघे तरुण दररोज दारूवर पैसा उधळत असल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हि कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो. नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ.अतुल वंजारी, किरण पाटील, इम्रान सैय्यद, छगन तायडे, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे सचिन पाटील, आदींनी ही कारवाई केली .

 

Leave A Reply

Your email address will not be published.